शब्दकोशाकडे

मानसशास्त्रीय समुपदेशन

मानसशास्त्रीय समुपदेशन म्हणजे सेवाग्राही आणि मानसशास्त्रज्ञ यांच्यातील व्यावसायिक परस्परसंवादाची प्रक्रिया आहे. सेवाग्राहीची स्वतःबद्दलची समज वाढवणे, त्यांच्या मानसिक समस्या आणि संघर्ष सोडवणे तसेच त्यांची स्वनियमनाची क्षमता वाढवणे हे या प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. ही प्रक्रिया व्यक्तीला अडचणींवर मात करण्यासाठी, बदलांशी जुळवून घेण्यासाठी आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वतःच्या साधनसंपत्तीचा सर्वोत्तम वापर करण्यास मदत करते आणि मानसिक स्वास्थ्य व सुसंवाद टिकवून ठेवते.