शब्दकोशाकडे

सामाजिक रूढप्रतिमा

सामाजिक रूढप्रतिमा म्हणजे लोकांच्या गटांविषयी किंवा सामाजिक घटनांविषयीच्या प्रचलित कल्पना आणि सर्वसाधारण समजुती यांच्या आधारे तयार झालेले पूर्वनिर्धारित मत. यामुळे त्यांच्या विविध वैशिष्ट्यांचे आणि स्वभावांचे आकलन व मूल्यमापन अतिसुलभ पद्धतीने केले जाऊ शकते. विचारांच्या या स्थिर प्रतिमा रूढप्रतिमा, पूर्वग्रहदूषित कल्पना किंवा सरासरीवर आधारित कल्पना असू शकतात, ज्या अनेकदा सामाजिक-सांस्कृतिक संकेत आणि प्रसारमाध्यमे यांच्याद्वारे लादल्या जातात.