शब्दकोशाकडे

दृश्य अग्नोसिया

दृश्य अग्नोसिया हा असा बोधनिक विकार आहे ज्यात दृष्टीशी संबंधित कोणतीही समस्या नसतानाही व्यक्तीला वस्तू दृश्य स्वरूपात ओळखता येत नाहीत. मेंदूला इजा झाल्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते आणि ती सामान्यतः डाव्या पश्चकपाल खंडाशी किंवा शंख खंडांशी संबंधित असते. दृश्य अग्नोसियाचे ॲपरसेप्टिव्ह (वस्तूंचे वर्गीकरण करण्यात अडचण) आणि असोसिएटिव्ह (वस्तूंची नावे सांगता न येणे) असे प्रकार आहेत.